पवन कल्याण यांच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट ‘दे कॉल हिम OG’ ला प्रदर्शित होण्यासाठी आजून ९ दिवस बाकी आहेत. मात्र, सध्या या चित्रपटाची चर्चा जगभरात पसरली आहे. मंगळवारी काही निवडक शहरांमध्ये अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या IMAX थिएटरमधील शो अवघ्या 2 मिनिटांत ‘हाऊसफुल’ झाला आहे. प्रदर्शनाआधीच पवन कल्याण यांच्या या चित्रपटाबद्दल तुफान उत्साह बघायला मिळत आहे. आता भारतात बुकिंग सुरू झाल्यावर हा चित्रपट कोणते रेकॉर्ड्स मोडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणारा आहे.
दे कॉल हिम OGच्या चित्रपटाची तिकिटं अवघ्या 2 मिनिटांत संपल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी एक्सवर बुकिंगचे स्क्रीनशॉट्स शेअर करत या बातमी साजरी केली आहे. यावर अनेक फॅन क्लबने ट्विट केलं आहे.पवन कल्याण यांच्या चित्रपटाचा उत्साह केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नसून तो जगभरातल्या चाहत्यांपर्यंत पोहोचला आहे.
मेलबर्न IMAX हे जगातील सर्वात मोठ्या IMAX स्क्रीनपैकी एक आहे, ज्यामध्ये सुमारे ४६१ सीट्स आहेत. मंगळवारी बुकिंग सुरू होताच अवघ्या एका मिनिटात बहुतेक तिकिटं विकली गेली, आणि दुसऱ्या मिनिटाच्या आत शो पूर्णपणे ‘सोल्ड आउट’ झाला.
पवन कल्याण नुकतेच आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले असून, त्यानंतर त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे आता त्यांनी चित्रपटसृष्टीपासून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.