सातारा : जिहे, ता. सातारा येथे स्थानिक प्रशासन, पोलिसांची परवानगी न घेता बेंदूर सणानिमित्त बैलांची मिरवणूक काढल्याप्रकरणी तसेच साऊंड सिस्टिमवर महिलांच्या नृत्याचा कार्यक्रम केल्याप्रकरणी जिहे येथील आठ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बेंदूर सणादिवशी, दि. 9 रोजी सायंकाळी 6.45 वाजता हा प्रकार घडला. पोलीस हवालदार महेंद्र नारनवर यांनी फिर्याद दिली असून, अमित ऊर्फ छोट्या अभिमन्यू जाधव, अनिकेत अभिमन्यू जाधव, निखिल चंद्रहास जाधव, सचिन विजय जाधव, रोहन रामदास जाधव, विक्रम बबन देवगुडे, अभिजित गेणू जाधव, शशिकांत साहेबराव फडतरे (सर्व रा. जिहे) यांच्यावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार राऊत तपास करत आहेत.