सातारा : बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेवाडी ता.सातारा येथे बेकायदा दारु विक्री प्रकरणी महोदव मडीवळ नाटेकर (वय 39, रा. नागेवाडी) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई दि. 25 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 840 रुपये किंमतीच्या 12 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.