सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रोहित कैलास माने रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा हा एसटी स्टँड परिसरातील बंद असणाऱ्या बसेसच्या ठिकाणी अंधारात आपला चेहरा लपवून बसलेला आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.