निवडून तर आम्हीच येणार......; साताऱ्यात दोन्ही राजांच्या निष्ठावंत अपक्ष उमेदवारांची निकराची झुंज

by Team Satara Today | published on : 25 November 2025


सातारा :  सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असलेतरी अद्यापही निवडणुकीत दोन्हीही राजे गटांच्या अपक्ष उमेदवारांची मांदियाळी दिसून येत असून निवडून तर आम्हीच येणार असे म्हणत दोन्ही राजांचे निष्ठावंत अपक्ष उमेदवार या निवडणुकीत निकराची झुंज देत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागो शेवटी आता पदरात घ्या अशा विनवण्या करत अपक्ष उमेदवार दोन्ही वाड्यावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज होणारच आहेत. 

जिल्ह्यात सातारासह ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सातारा शहरात ५० जागांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजप, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव ठाकरे शिवसेना गट म्हणजेच ( तिसरी आघाडी ) आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट पूर्ण ताकतीने उतरले आहेत. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असले तरी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी या दोन्ही आघाडीचे अस्तित्व मात्र कायम ठेवले आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी साताऱ्यात तीन जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे भाजपचे तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. 

सातारा पालिकेत नगरसेवक पदांच्या ५० जागांसाठी एकूण १६९ उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये अपक्षांची संख्या अधिक असल्यामुळे या लढती लक्षवेधी ठरणार आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष, आ. अतुल भोसले यांनी कालच आपल्या बॅनरवर अपक्ष उमेदवारांनी दोन्हीही राजासह भाजप नेत्यांचे फोटो वापरू नयेत, असा स्पष्ट इशारा दिला आहे. मुळात दोन्ही महाराज केवळ पोस्टरवर नसून ज्या अपक्ष उमेदवारांच्या हृदयात आहेत, त्या अपक्ष उमेदवारांना भाजपश्रेष्ठी कसे थोपवणार, हाच मूळ प्रश्न आहे. अपक्ष उमेदवारांकडे नजर टाकली असता हे उमेदवार दोन्हीही राजांचे कार्यकर्ते, समर्थक असल्याचे स्पष्ट होते. अद्यापतरी सातारा शहरात बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांवर दोन्ही वाड्यांवरून कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. याचा अर्थ बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांबाबत अद्यापही मवाळ धोरण अवलंबविले असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे अपक्ष  

उमेदवारांनी आपले अर्ज काढून घ्यावेत या संदर्भात दोन्हीही वाड्यांवरुन फार आक्रमक भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे अपक्ष व बंडखोर उमेदवारांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला असल्याचे स्पष्ट होत आहे. शेवटी काय बंडखोरी करून निवडून आलेले अपक्ष आता आम्हाला पदरात घ्या अशा विनवण्या करून दोन्हीही वाड्यावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज राहणार आहेत.

 चिन्ह वाटपाला विलंब....

सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक होते. ही निवडणूक राजे विरुद्ध राजे अशी होईल, असे गृहीत धरून अनेकांनी आपला वेळ व पैसा खर्च केला होता. प्रत्यक्षात मात्र मनोमिलन झाल्यामुळे दोन्हीही आघाडीच्या वाट्याला जागा कमी आल्या. त्यामुळे अपक्ष बंडखोरीचे प्रमाण वाढले. अपक्ष उमेदवार आपले अर्ज माघारी घेत नसल्याचे पाहता


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिहे- कठापूरबाबत सेवागिरी मंदिरात खुली चर्चा करा- आ. शशिकांत शिंदे ; भूलथापा नको, कुणाचे किती योगदान जनताच ठरवेल
पुढील बातमी
धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करा : सुप्रिया सुळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

संबंधित बातम्या