सातारा : शहरातील केसरकर पेठ परिसरातून एका विवाहिता बेपत्ता होण्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अर्जुन शिवाजी सपकाळ (वय ३२, रा. तालीम संघ मैदान, लहुजी वस्ताद पुतळ्यामागे, केसरकर पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पत्नी कविता अर्जुन सपकाळ (वय २५) या शुक्रवारी दि. १५ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ''शेजारी जाऊन येते'' असे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र त्यानंतर त्या परत न आल्याने त्या बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला; परंतु काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत असून, संबंधित विवाहीतेबाबत कोणास काही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.