सातारा : मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल अंकुश मोरे (वय 35, रा. प्रतापसिंहनगर) यांनी तेथीलच किशोर जाधव, अरुण क्षिरसागर, सुदाम क्षिरसागर यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 13 मे रोजी सदरबझार येथे घडली आहे. रॉडने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस फौजदार बसवंत करीत आहेत.