सातारा : पोक्सो प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका विधी संघर्षित बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुरुवार पेठ, सातारा येथील एका विधी संघर्षित बालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.