सातारा : सासपडे प्रकरणातील दुर्दैवी अल्पवयीन बालिका आर्या सागर चव्हाण हिचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी त्याचा तात्काळ एन्काऊंटर करावा.आरोपींना कायद्याचे भय वाटले पाहिजे, अशी रोखठोक मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती ताई देसाई यांनी केली आहे.
देसाई यांनी शनिवारी सासपडे येथील पीडित मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच यापूर्वी त्याच गावातील ज्या अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याही मुलीच्या आई-वडिलांना भेटून त्यांना धीर देण्याचे काम तृप्ती ताई यांनी केले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्यासातारा नगरी ही ऐतिहासिक नगरी असून त्याला राजधानी सातारा असे म्हटले जाते या भूमीला छत्रपती शिवरायांच्यापदस्पर्शाचा पावन इतिहास आहे छत्रपती शिवरायांनी स्त्री स्वातंत्र्याचा नेहमीच सन्मान केला अशा सातारा नगरीमध्ये एकाच गावातील दोन मुलींना काही वर्षांमध्ये दुर्दैवीर त्या बळी पडावे लागते असा हा नराधम आरोपी राहुल यादव यांचा पोलिसांनी एन्काऊंटरच केला पाहिजे कारण आरोपींना कायद्याचा धाक उरलेला नाही .हैदराबाद तसेच तत्सम काही प्रकरणांमध्ये जर पोलीस आरोपीचा एन्काऊंटर करू शकतात तर सासपडे येथील या नराधमाला सुद्धा त्याच पद्धतीने कठोर शासन झाले पाहिजे असा आग्रह तृप्ती देसाई यांनी धरला.तसेच या प्रकरणांमध्ये तत्कालीन पूर्वीच्या पिढीत युवतीला जो दुर्दैवी मृत्यू आला त्यामधील दोशी शासकीय यंत्रणांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.