सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात राहणाऱ्या युवतीचा पाठलाग करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी अबू अस्लम शेख रा. करंजे पेठ, सातारा आणि सुरज उंबरकर रा. मोळाचा ओढा, सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 December 2024