सातारा : सातारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्धल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर ह्या नीच प्रवृतीच्या कालबाह्य माणसाचा जाहीर निषेध करून जोडे मारो आंदोलन शिवस्मारक पोवई नाका येथे करण्यात आले.
अशा नीच प्रवृत्ती वेळीच प्रशासनाने ठेचल्या पाहिजेत आणि अशांनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन करून बेताल वक्तव्य करणाऱ्या अपप्रवृत्ती च्या विरोधात कडक कायदे झाले पाहिजेत अशी मागणी शिवसैनिकांनी केली.
या प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा संघटक प्रणव सावंत, उपजिल्हा संघटक सादिक बागवान, शहरप्रमुख रवींद्र भणगे, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, आरोग्य सेनेचे सुमित नाईक,युवासेना शहराधिकारी शिवेंद्र ताटे, उपतालुका प्रमुख आकाश धोंडे, श्रीकांत पवार, आकाश पवार, रामचंद्र साळुंखे, अशितोष पारंगे, समीर पठाण, हरिश्चंद्र पटेल, दत्तराज हिरवे, आणि शिवसैनिक उपस्थित होते.