सातारा : महाराष्ट्र शासनाच्या 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा 'या उपक्रम अंतर्गत सातारा शहरातील सदर बाजार येथील पुण्यशील राजमाता श्रीमंत छत्रपति सुमित्राराजे भोसले ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन उदघाटन समारंभ व महिला वाचक मेळावा संपन्न झाला.
ग्रंथालयाच्या कोषाध्यक्ष सौ. सुनीता कदम, ग्रंथपाल संतोष लाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. mसदर कार्यक्रमास समाज सेविका सौ. कांचनताई घोडके आणि सौ. शिवानीताई कळसकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सौ.गौरी गुरव, निशा जाधव, सौ . कविता चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमांस सदरबाझर मधील महिला वाचक सौ. प्रिया सणस, राणी गायकवाड, माधवी लाड, सुनीता किर्वे, कीर्ती पोळ, कोमल इंगवले, माधुरी लाड आदी महिला उपस्थित होत्या.
सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच चार कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे वाचन संस्कृती वाढणार अशी आशा अनेक लेखक व वाचकांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला महिला वर्गाने उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांना धन्यवाद दिले.
दरम्यान,सातारा जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथालय वाढवणे यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या युवा पिढी मोबाईल मध्ये पाठवण्यात आलेल्या अनेक अनावश्यक मजकूर वाचण्यात मग्न असतात. परंतु, खऱ्या अर्थाने आपल्या मराठी लेखकांनी माहितीचा खजाना व संस्कार जपण्याचे काम केलेले आहे. वाढदिवसानिमित्त केक कापणे, बॅनरबाजी, जाहिरात बाजी करणे, रस्त्यावर फटाके वाजविणे. गोंधळ घालणे. यापेक्षा जर चांगली पुस्तके किंवा ग्रंथ भेट देऊन त्याचे वाचन केले तर खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती अधिक बळकट होईल. अशी अपेक्षा अनेक वाचकांनी सातारा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात झालेल्या अनेक विधायक उपक्रम व विविध कार्यक्रमात मत व्यक्त केले आहे. त्याचीही वाचकप्रिय मान्यवरांनी स्वागत केले आहे. वाचनामुळे बुद्धिमत्ता वाढते व आपले आचरण सुधारते असेही काहींनी सांगितले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
