सातारा : शाहूपुरी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातून 15 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी दिनेश विवेक नेवाळकर (वय 33, शाहूपुरी) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 24 सप्टेबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी घरातून एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर, सिलेंडर असे साहित्य चोरुन नेले आहे.