एकसळ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे कुमठे (ता. कोरेगाव) येथील सिमरन शमा सिकंदर इनामदार हिची महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे. सिमरन हिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वालचंदनगर (जि. पुणे) येथील भारत चिल्ड्रन ॲकॅडमी ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले, तर येथील डी. पी. भोसले महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत तिने पदवी घेतली.
त्यानंतर पुणे येथे तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. सन २०२३ मध्ये दिलेल्या स्पर्धा परीक्षेतून त्यांची नुकतीच महसूल सहाय्यकपदी निवड झाली. गुरुजन वर्ग, आई, वडील, आजी-आजोबा यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे फळ आपल्याला मिळाल्याचे सांगत आपण हे यश त्यांना समर्पित करत असल्याचे सिमरन हिने सांगितले. माजी सुभेदार मेजर सिकंदर वजीर इनामदार यांची सिमरन ही कन्या आहे.
कोरेगाव मुस्लिम समाजाच्या वतीने सिमरन हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जैनुद्दीन मन्सूर बागवान, निसार खान, उमर नूरमहंमद जमादार, मुन्ना काझी, वारीस कुरेशी, वसीम नजीर शिकलगार, मुस्ताक खान, पप्पू मुल्ला, सिकंदर खलिफा, गफार कुरेशी, जहाँगीर मुलाणी, अस्लम शेख मिस्त्री, आरिफ शेख, नासिर कुरेशी, शब्बीर सय्यद व समाजबांधव उपस्थित होते.