सातारा : सातारा शहरातील जयविजय थेटर येथे पादत्राणे व्यावसायिक असणाऱ्या संजय हनुमंत सावंत यांनी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले .या प्रकारामुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. जागा विकून दिलेले पैसे परत नाही मिळाल्याने नैराश्यग्रस्त होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती आहे.
सातारा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. संजय सावंत यांनी आपली मालकीची जागा विकून नातेवाईकांना पैसे दिले होते. बराच काळ पाठपुरावा करूनही नातेवाईकांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. संबंधित नातेवाईकांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संजय सावंत यांनी आर्थिक विवंचनेती मधून आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळतात सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सावंत यांनी आर्थिक विवंचनेचा व्हिडिओ बनवला असून त्यानंतर त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले संबंधित व्हिडिओ तसेच आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहेत त्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे याची फिर्याद सावंत यांचा मुलगा दिनेश सावंत यांनी पोलिसांमध्ये दिली आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .