सातारा : सातारा शहरातील मंगळवार पेठ, गुजर आळी, काशी विश्वेश्वर मंदिरालगत सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी दिनांक २६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ७५० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी जयंत बजरंग इनामदार (वय ६१ रा. मंगळवार पेठ सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल मोरे करत आहे.
मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिरालगत जुगार अड्ड्यावर छापेमारी
by Team Satara Today | published on : 27 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा