सातारा : परिसरात जमिनीच्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे. दि.६ रोजी रात्री ११ च्या सुमारास प्रीती हॉटेलजवळील गोल्डन गेट हॉटेलसमोरील पार्किंगमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादावरून घनश्याम मतकर (रा.गोडोली) याने कन्ट्रक्शन व्यावसायिक असलेले फिर्यादी विनोद जिन्नस जगताप (वय ४८. पनवेल, रायगड) यांच्याशी वाद घालून त्यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या चेहऱ्यावर, छातीवर तसेच डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी संशयित आरोपीने फिर्यादीचा गळा पकडून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करत आहे.