गावामध्ये प्रत्येक ठिकाणी सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि समर्थक, कार्यकर्ते यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आ. शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे कुडाळ जिल्हा परिषद गटाचा कायापालट झाला असून संपूर्ण कुडाळ गट शिवेंद्रराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा शब्द ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी दिला. संपूर्ण मतदारसंघात आ. शिवेंद्रराजेंनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांनाच विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार कुडाळकरांनी व्यक्त केला.
आ. शिवेंद्रराजे प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सातारा- जावली मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. मतदारसंघाचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन, सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी केले.