छत्रपतींच्या वारसदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे

दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांची अपेक्षा

by Team Satara Today | published on : 11 November 2024


सातारा : छत्रपतींचे वारसदार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा व माझा स्नेह गेल्या पंचवीस वर्षापासूनचा आहे. महायुती शासनाने तसेच केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे यांना निश्चित संधी मिळावी अशी अपेक्षा दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केली. 

येथील साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी उपनगराध्यक्ष अविनाश दादा कदम, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, तसेच दलित महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

सकटे म्हणाले, स्वर्गीय अभयसिंह उर्फ दादा महाराज यांच्याशी माझा गेल्या 30 वर्षापासून चा स्नेहबंध होता. तेच नेतृत्व तेच संस्कार तीच कार्यपद्धती ही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आहे. केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक उपयोगी निर्णय घेतले आहेत. राज्यांमध्ये सुद्धा महायुती सरकारने पार्टीच्या धरतीवर मातंग समाजासाठी वेगळे महामंडळ देण्याची घोषणा केली आहे, त्याचे मी स्वागत करतो. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी व वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, हे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे व्यक्तिमत्व सर्वश्रुत आहे. त्यामुळे दलित महासंघाच्या वतीने त्यांना साताऱ्यात पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मी आमदार या नात्याने मातंग समाजाच्या समस्यांसाठी कायम त्यांच्या बरोबर आहे त्यांचे महत्त्वाचे प्रश्न विधानसभेमध्ये पोहोचवण्यामध्ये सुद्धा मी कुठेही कमी पडणार नाही. साताऱ्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते. त्यामुळे येथील प्रतापसिंह महाराज हायस्कूल आणि सदर बाजार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य झालेला आमणे बंगला येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाला निश्चित पाठपुरावा करून भूमिका घेणे, संदर्भात परिस्थिती तयार करू असे थेट आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विस्तारा विमानाचे आज शेवटचे उड्डाण
पुढील बातमी
मतदान दिवस आणि मतदान पूर्व दिवस प्रिंट मिडीयामध्ये देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

संबंधित बातम्या