मतदारयादीत deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही : निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले

मतदान प्रक्रिये संबंधी अफवा पसरवल्यास कारवाई होणार

by Team Satara Today | published on : 13 November 2024


सातारा :  मतदारयादीत deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. अशी कोणतीही procedure मतदान केंद्रावर होत नसते.  अशी माहिती सातारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे.

ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे,  ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे कि ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा.

अशा प्रकारचा फेक मेसेज काही व्हाट्सअप वरून फिरत आहे. तरी सदरचा मेसेज ही निव्वळ अफवा असून यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये, तसेच मतदान प्रक्रिये संबंधी अशा प्रकारच्या अफवा ही कोणी पसरवू नयेत, अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही   सातारा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुधाकर भोसले यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सुट्टी
पुढील बातमी
घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात मुलाचा मृत्यू

संबंधित बातम्या