दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक व शाही सीमोल्लंघन सोहळ्यामुळे शहरातील वाहतुकीत बदल

by Team Satara Today | published on : 11 October 2024


सातारा : दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक व शाही सीमोल्लंघन सोहळा असल्याने सातारा शहरात आज वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. भक्तांनी व नागरिकांनी पोलिसांना त्यानुसार सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे सपोनि अभिजीत यादव यांनी केले आहे.

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांकडून दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक काढली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून नागरीकांची तसेच वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच वाहतूकीची कोंडी होऊ नये, अपघात घडू नये अथवा कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उद्या शनिवारी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

दैनंदिन वाहतूकीत बंदी घालण्यात आलेल्या मार्गामध्ये राजपथावर कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक, मोती चौकापर्यंत येणार्‍या जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. कमानी हौद ते शेटे चौकापर्यंत येणार्‍या- जाणार्‍या सर्व वाहनांना प्रवेश बंद. कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक पर्यंत येणारे जाणारे प्रवेश बंद राहतील. मोती चौक, एम.एस.ई.बी. ऑफिस, समर्थ टॉकिज, विसर्जन कृत्रीम तलाव, आंदेकर चौक, करंजे पेठ पर्यंत येणारे-जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद. स्टेट बँक प्रतापगंजपेठ सातारा (काटदारे मसाले दुकान) डि.सी.सी. बँक मोती तळे पर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद. विठोबाचा नळ ते जलमंदिर कडे येणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका पर्यत येणार्‍या-जाणार्‍या सर्व वाहनांना प्रवेश बंद. समर्थ मंदिर ते चॉंदणी चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद. बोगदा ते शाहू चौक हा मार्ग जड वाहनांसाठी (एस.टी. बस सह) व अवजड वाहनांसाठी बंद राहील (सज्जनगड व कास पठारकडे जाणारी व येणारी जड वाहने (एस.टी.बस सह) व अवजड वाहने बोगदा, शेद्रे मार्गे जातील व येतील)

वाहतूक मार्गातील बदलांमध्ये बोगदा, समर्थ मंदिराकडून चॉंदणी चौक मार्गे एस.टी. स्टॅन्ड साताराकडे येणारी सर्व वाहन (जड व अवजड वाहने वगळून) ही चॉंदणी चौक राजवाडा मार्गे न येता समर्थ मंदिर, अदालतवाडा, शाहूचौक मार्गे एस.टी. स्टॅन्ड साताराकडे जातील. मोळाचा ओढा कडून सातारा शहरात येणारी सर्व बाहने ही मोळाचा ओढा, महानुभव मठ, करंजे, भुविकास बैंक चौक, मार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्वर मंदीर, राधिका टॉकीज चौक, राधिका रोड मार्गे एस.टी. स्टॅन्ड येणारी वाहने ही कोटेश्वर मंदीर शाहुपूरी मोळाचा ओढा मार्ग महानुभव मठ, करंजे, भुविकास बैंक मार्गे एस.टी. स्टॅन्ड कडे येतील. मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहू चौक, अदालत वाडा मार्ग समर्थ मंदीर मार्गस्थ होतील.

शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटार स्टॅन्ड मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने त्या परिसरात राहणार्‍या रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावे. मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे येथे बुधवार नाका परिसरात राहणार्‍या रहिवाशांनी आपली वाहने शाहूपुरी अथवा पर्यायी मार्गाने घेऊन जावीत. अशाप्रकारे सर्व मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात बदल करण्यात येत आहे.

पार्किंग बाबत पोलिसांनी असे आवाहन केले आहे की दुर्गा विसर्जन करीता येणारे नागरीकांनी आपली वाहने तालिम संघाजवळील मैदान , गुरुवार परज , गांधी मैदान , कोटेश्वर मैदान या चार ठिकाणी अथवा आपल्या पर्यायी जागेत पार्किंग करावीत. अशाप्रकारे सर्वांनी सहकार्य करावे , असे आवाहन शहर वाहतुक विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणीच्याच खात्यात जमा
पुढील बातमी
शाहूनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यात बसून चक्क केली अंघोळ

संबंधित बातम्या