सातारा येथे प्रथमच मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर

by Team Satara Today | published on : 03 May 2025


सातारा :  कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. साताऱ्यात प्रथमच होत असलेले  हे शिबीर रविवार दि. ४ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत कला, वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदान सातारा येथे होणार आहे. 

या शिबिरमध्ये हाडाचे फ्रॅक्चर (अपघात मध्ये मोडलेली हाड), अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर, दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन, सर्व प्रकारचे कॅन्सर ऑपरेशन, केमोथेरपी, केमोथेरपी पोर्ट, डायलिसिस, ए.व्ही फिश्चुला (डायलिसिस रुग्णांसाठी),  पमकॅथ (डायलिसिस रुग्णांसाठी), दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे ऑपरेशन, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेली थायरॉईड गाठी वर मायक्रोवेव द्वारे (विना ऑपरेशन) अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशय गाठी वर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेह मुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन यांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. 

शिबिरात मोफत ई. सी. जी., अँजिओग्राफी, रक्तातील साखर तपासणी, लघवीची धार तपासणी,  प्रोस्टेट विशिष्ट अँटीजेन तपासण्या करण्यात येणार आहेत. नाव नोंदणीसाठी 8928736999 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अथायु हॉस्पिटल मध्ये मेंदू व मणका ऑपरेशन, हॅर्निया, अँपेंडिक्स, मूळव्याध, फिशर , गुडघा व खुबा प्रत्यारोपण, किडनी ट्रान्सप्लांट (प्रत्यारोपण) सवलतीच्या दरात केले जाणार आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित
पुढील बातमी
तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्ये कलम १४४ जमावबंदी आदेश लागू

संबंधित बातम्या