राज्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान केले जाणार आहे. या विधानसभा निवडणूकीत सर्व मतदारांना त्यांचा सर्वात महत्वाचा हक्क म्हणजे मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जाहिर केली आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रामधील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमामध्ये किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. त्यामुळे उद्योग विभागाकडून देण्यात आलेली मतदानाची सुट्टी ही या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
जर अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना मतदानाच्या दिवशी पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येऊ शकतेे मात्र याकरिता संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक असेल अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
उद्योग विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची योग्य ती खबरदारी घ्यावी. जर विभागांतर्गत असलेल्या आस्थापनातील कोणत्याही कर्मचारी मतदाराकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य झाले नाही. अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
आज राज्यात उमेदवारांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. राज्यात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. राज्यातील मतमोजणी ही शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येंने मतदानासाठी यावे याकरिता निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई |
अतित येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु |
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार |