11:56am | Oct 30, 2024 |
सातारा : विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरु झाले असून सातारा- जावली मतदारसंघांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सातारा तालुक्यातील शेंद्रे, परळी, लिंब जिल्हा परिषद गटानंतर कोंडवे गटात शिवेंद्रसिंहराजेंनी घर टू घर जाऊन मतदारांशी संवाद साधला. कोंडवे गटातील मतदारांनी सर्वात जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला असून 'सिर्फ शिवेंद्रसिंहराजे आमदार हमारा' असा नारा दिला.
कोंडवे गटातील सैदापूर गावठाण, सैदापूर आदर्श घरकुल, कोंडवे- दिव्यनगरी, कोंडवे गावठाण, हामदाबाज, सारखळ, हिरापूर, नुने, बेबलेवाडी, ठोंबरेवाडी, गवडी, इंगळेवाडी, साबळेवाडी, कण्हेर, जांभळेवाडी, चोरगेवाडी, जोतिबावाडी, अहिरेवाडी, आगुंडेवाडी, वेळे, कामथी आदी गावांमध्ये गावभेट दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष महेश गाडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लवंगारे, लक्ष्मण कडव, बाळासाहेब चोरगे, बाळासाहेब ननावरे, संदीप शिंदे, नाना शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, धर्मराज घोरपडे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण कापसे, सागर पवार, दादा बडदरे, राहुल काळे, तात्यासाहेब वाघमळे, रमेश चव्हाण, शिवराम घोरपडे, मधुकर निंबाळकर, दिलीप निंबाळकर, मछिंद्र गोगावले, अरुण पवार, किरण पवार, संभाजी इंदलकर, सीमा जाधव, बाजीराव कारंजकर, फारुख खान, मोहित चोरगे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजेंचे प्रत्येक ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. सर्वच गावांमधून शिवेंद्रसिंहराजेंना मताधिक्य देण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. सर्व गावातील विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावून असंख्य विकासकामे करण्यात आली आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून रस्ते, पाणीप्रश्न सोडवले, आरोग्य सुविधा निर्माण केल्या, शाळा खोल्या असतील, समाजमंदिर, सभामंडप, ग्रामपंचायत इमारत बांधल्या. सर्वप्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. आगामी काळात राहिलेली विकासकामे प्राधान्याने करून ग्रामस्थांची प्रत्येक अडचण सोडवली जाईल, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजेंनी याप्रसंगी दिली.
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई |
अतित येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु |
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार |