सातारा : सातारा शहरातील तीन दारू अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी तीन जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी रात्री साडेअकरा वाजता बोगदा परिसरातील मामा पान शॉप शेजारी स्वप्निल सतीश कदम रा. मंगळवार पेठ, सातारा हे अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून सतराशे पन्नास रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत, चिपळूणकर बागेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत अवैध दारू विक्री करताना विठ्ठल दिनकर बडेकर रा. मंगळवार पेठ, सातारा हे आढळून आले. त्यांच्याकडून 3880 रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या घटनेत, भीमा सुभाष बनसोडे रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा हे विकास नगर येथील एका दुकानाच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 7000 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.