सातारा : कोपर्डे, ता. खंडाळा येथे कोयत्याचा धाक दाखवून महेंद्र सोपान दुर्गुडे (वय 34, रा. कोपर्डे ) याला जुन्या भांडणाच्या कारणातून बेदम मारहाण करण्यात आली आहे. दि. 17 जानेवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार रोहित हनुमंत धायगुडे, आकाश देवराम कचरे, शुभम प्रकाश निकम, दादा दशरथ कचरे, सोन्या आप्पासो ठोंबरे, शुभम दिलीप धायगुडे सर्वजण (रा. पाडळी, ता. खंडाळा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
संबंधितांनी फिर्यादी धुरगुडे याला एकट्याला पाहून जुन्या भांडणाच्या कारणातून काठीने मारहाण केली .गावालगतच्या गोळे वस्ती येथे हा प्रकार घडल्याची माहिती आहे तसेच या मारहाणीत त्याला तोंडाला आणि डोक्याला जबर दुखापत झाली तसेच कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची सुद्धा धमकी देण्यात आली पोलीस हवालदार पवार अधिक तपास करत आहे.