अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 May 2025


सातारा : बेदरकारपणे दुचाकी चालवून वृद्ध महिलेला जखमी केल्याप्रकरणी यश बाळासाहेब जाधव रा. सोनवडी, ता. सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात मारवाडी चौकातील सातारा प्लायवूड समोर झालेला आहे. या अपघातात शालन सुधाकर रसाळ या जखमी झाल्या आहेत. सुधाकर रसाळ वय 76, रा. सोमवार पेठ, सातारा यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डमकले करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वर्ये येथे 80 किलो तांब्याच्या तारेची चोरी
पुढील बातमी
पूर्व वैमनस्यातून एकास कोयत्याने मारहाण

संबंधित बातम्या