विनापरवाना कीटकनाशक विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 12 August 2025


सातारा : विनापरवाना सातारा शहरात कीटकनाशक विकणार्‍या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सातारा तालुक्याचे गुण नियंत्रण कृषी अधिकारी युवराज काटे यांनी ही फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज काटे यांना सातारा शहर परिसरामध्ये विनापरवाना कीटकनाशक विकली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. ही कारवाई अजंठा चौक प्रीती हॉटेल शेजारील गाळ्यांमध्ये दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते सहा या दरम्यान करण्यात आली आहे. कडू एकनाथ अधाने वय 53 राहणार दिलवशी कॅन्टोन्मेंट, गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर व गणेश चंद्रभान साळुंखे राहणार रायपूर देवगाव सैनिक शाळेजवळ, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काटे यांनी येथील दुकानावर भेट देऊन पाहणी केली असता संबंधितांकडे कीटकनाशक कायदा 1968 नुसार कीटकनाशक विक्रीचा कोणताही परवाना नव्हता. तसेच नियम 15 नुसार त्या दोघांनी कीटकनाशक विक्री करताना कोणतेही बिल शेतकर्‍यांना दिले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात महिलेला जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
मसाप, शाहूपुरी शाखेस आज पुरस्कार वितरण

संबंधित बातम्या