मुंबई : माझा मुलगा समाधान सरवणकर आणि महत्वाचे 4 पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. माझे वडील तुमच्याशी बोलू इच्छितात असे त्यांना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायला सांगितलंय, असे समाधान सरवणकर यांनी सांगितले. पण मला काही बोलायचं नाही. असे राज ठाकरे त्यांना म्हणाले. त्यांनी भेटसुद्धा नाकारल्याची माहिती सदा सरवरणकर यांनी दिली.
मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. काही समीकरणं त्यांना समजवावीत असं मला वाटलं होतं पण त्यांनी भेट नाकारली. तुम्हाला उभं राहायचंय तर उभ राहा. मला कोणाशीच बोलायचं नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
पुढे काय करायचं हे मतदार ठरवतील. राज ठाकरे काय बोलले असते तर त्यांच्या शब्दाचा मान ठेवला असता. राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. पण त्यांनी भेटच नाकारली.
मी महायुतीचा उमेदवार आहे. त्यामुळे महायुतीचे सर्व नेते मला पाठींबा देतील, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.