सातारा शहरात रमजान ईद उत्साहात; जामा मशीद येथून ईदगाहपर्यंत जुलूस, शांतता, समृद्धीसाठी विशेष प्रार्थना

by Team Satara Today | published on : 21 March 2026


सातारा : सातारा शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सकाळी सदरबाजार येथील जामा मशीद येथून ईदगाहपर्यंत जुलूस काढण्यात आला होता.

यानंतर सदर बाजार येथील ईदगाह मैदान तसेच गेंडामाळ येथील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईदची नमाज अदा केली. नमाजानंतर सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा अंत होऊन देशात व जगात शांतता प्रस्थापित व्हावी, तसेच भारत देश अधिक बलवान, सुख-समृद्ध व्हावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

शहरातील विविध मशिदींमध्येही ईदची नमाज अदा करण्यात आली. यानंतर सर्वांनी एकमेकांना “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. यावेळी सदरबाजार मशिदीचे मौलाना नूरी अहमद अन्सारी यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'चवदार तळे' सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकृत पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
पुढील बातमी
अनिल देसाई, संदीप मांडवेंवर अपहरणाचा गुन्हा; आपले अपहरण झालेच नाही : दिनकर शिंदे

संबंधित बातम्या