पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद

अमितदादा कदम यांना सहकार्य करण्याची मतदाराची ग्वाही

by Team Satara Today | published on : 07 November 2024


सातारा : महाविकास आघाडी तथा मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या सातारा शहराच्या पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. गुरुवारी प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या गडकर आळी,  सर्वोदय कॉलनी, धुमाळ आळी, पेढ्याचा भैरोबा, समाधीचा माळ, सह्याद्री पार्क या परिसरात पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख प्रणव सावंत, शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, रविंद्र भंणगे, रजनीताई पवार, बाळासाहेब बाबर, सागर धोत्रे, शिवेंद्र ताटे, गणेश हिवाळे,  इम्रान बागवान,  सुमित नाईक,  दत्तात्रय साळुंखे,  प्रकाश जाधव, प्रशांत इंगळे, पांडुरंग कदम,  प्रकाश पवार, तसेच नागरिक उपस्थित होते. सकाळी साडेसात ते साडेबारा या पाच तासांमध्ये झालेल्या शिव संवाद यात्रेमध्ये नागरिकांनी या पदयात्रेला चांगलाच प्रतिसाद दिला, बहुतांश ठिकाणी अमितदादा  कदम यांचे सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले. 

अमितदादा यांनी जेष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शिवसैनिकांनी या पदयात्रेचे नेटके आयोजन केले होते. प्रणव सावंत यांच्या सहकार्याने तब्बल बारा कॉलनीमध्ये अमितदादा यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना मशाल चिन्हाची आठवण करून दिली. या शिवसंवाद यात्रेला नागरिकांनी प्रतिसाद देत त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अमितदादा जावळी तालुक्यातील मेढा येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतदारसंघासातील विकसपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या
पुढील बातमी
आयपीएल 2025 मेगा लिलावात युवराज सिंहसह कैफ आणि तेंडुलकरचीही नाव नोंदणी

संबंधित बातम्या