सातारा तालुक्यात नवरात्रौत्सव डॉल्बीमुक्त साजरा करावा

पोलीस निरीक्षक निलेश तांबे; नवरात्र उत्सव अनुषंगाने अलंकार हॉलमध्ये बैठक

by Team Satara Today | published on : 15 September 2025


सातारा, दि. १५ :  सातारा तालुका हद्दीत डॉल्बीचे प्रमाण कमी झाले आहे. गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने गणपतीच्या मिरवणुका सार्वजनिक मंडळांनी काढल्या होत्या. त्याच पद्धतीने नवरात्र उत्सवही डॉल्बी मुक्त साजरा करा, असे आवाहन सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले.

नवरात्र उत्सव अनुषंगाने बैठक अलंकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र, सातारा येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे, एमएसईबीचे सुतार, विशाल जाधव, महेंद्र नारनवर, कुंभार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निलेश तांबे म्हणाले, पोलीस पाटील हा पोलीस आणि लोकांच्या मधील महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. दुर्गादेवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी वापरू नका. कोणालाही डॉल्बीसाठी परवानगी मिळणार नाही. डॉल्बी वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासन तुम्हाला सहकार्य करेल. तर नवरात्र उत्सव साजरा करताना वर्गणीसाठी कोणीही सक्ती करू नका अन्यथा मंडळावर कारवाई करण्यात येईल. असेही ते म्हणाले.

विजयकुमार धायगुडे म्हणाले महसूल विभागाच्या वतीने सर्व मदत मिळेल. त्याचप्रमांणे सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ईपीक नोंद लवकरात लवकर करावी. जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ मिळेल.

आगामी साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, शांतता कमिटी सदस्य व सर्व पोलीस पाटील उपस्थीत होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील साळुंखे यांनी केले तर आभार गोसावी यांनी मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा रेल्वे स्थानकात रंगले काव्यसंमेलन
पुढील बातमी
महसूल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या