सातारा : पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 नोव्हेंबर 2022 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान वीरश्री विकास कोळी रा. बावधन वाडा, ता. वाई, जि. सातारा. सध्या रा. चंदन नगर, गोडोली, सातारा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार मारहाण केल्याप्रकरणी पती विकास बिभीषण कोळी रा. बावधन वाडा, ता. वाई, जि. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.
पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा