सातारा : येथील श्री पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या सहस्रचंडी याग सोहळ्याची सांगता शुक्रवारी सकाळी 11 वाजता, 65 वेदमूर्ती व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत तसेच सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे शुभ हस्ते होम कुंडामध्ये हविष्य अन्न तसेच विविध प्रकारच्या आहुती, वस्त्र, श्रीफळ अर्पण करून होणार आहे .या या सोहळ्याचा प्रधान संकल्पही श्रीमंत छत्रपती उदयनराजे व श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांच्या हस्ते सोडण्यात आला होता. दि. 4 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देश आणि परदेशातूनही मान्यवरांनी तसेच हजारो देवी भक्तांनी भेट दिली.
दरम्यान या यज्ञ सोहळ्यात गुरुवारी दिवसभर देवी भक्तांनी देवी मूर्तीला कुंकूमार्चन तसेच विशेष करून द्रव्य अर्चन सोहळा संपन्न केला.सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या द्रव्य अर्चना सोहळ्यामध्ये मंदिरातील श्री यंत्रावर कुंकुमार्चन केल्यानंतर सर्व उपस्थित भक्तांच्या हस्ते द्रव्य म्हणजेच नाणी वाहण्यात आली .ही नाणी त्यानंतर भेट स्वरूपात सर्व भक्तांना देण्यात आली .कुमकुम अर्चना सोहळ्या बरोबरच हा द्रव्य अर्चना सोहळा ही विशेषत्वाने या कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत करण्यात आला होता. या उपक्रमाबद्दल अनेक मान्यवर भक्तांनी मंदिर ट्रस्टचे विशेष आभार मानले, अशी माहिती ओंकार शास्त्री बोडस यांनी दिली.
त्यानंतर सायंकाळी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या उपस्थितीत मंदिर परिसरामध्ये दीप अर्चना करण्यात आली. हजारो दिवे व पणत्या लावून देवीची महाआरती करण्यात आली. तसेच मंदिराच्या गर्भगृहापुढे बांधण्यात आलेल्या भव्य फुलांनी सजवलेल्या पाळण्यात देवी मूर्तीला जोजविण्यात आले. असा हा अनोखा सोहळा शेकडो देवी भक्तांनी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवला.
दरम्यान शुक्रवारी सकाळी या यज्ञ सोहळ्याची पूर्णाहूती सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. यासाठी सातारचे खासदार श्री .छ उदयनराजे भोसले व त्यांच्या सुविध्य पत्नी श्री .छ सौ. दमयंतीराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी समर्थ सदन येथे वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचा विशेष सत्कार ज्येष्ठ सुप्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांच्या शुभहस्ते मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे .भव्य नागरी सत्कार व समारोप कार्यक्रम सोहळ्यास सर्व सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख तसेच विश्वस्त समितीने केले आहे.
रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी मोफत शिबिर तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महा शिबिर आयोजित आयोजन करण्यात आले आहे .बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या सहस्त्रचंडी महायज्ञ यांच्या धार्मिक सोहळ्यासाठी राज्याच्या प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सह विविध मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून या यज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख ,उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे ,उपाध्यक्ष शिवाजी भोसले .कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत आहेत.
सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी ,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.