सातारा : सातारा शहरात शाहुपूरी येथील दिवेकर हॉस्पिटलजवळ एका रिक्षाचा अपघात झाला. ही घटना १६ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या अपघातात १६ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. याबाबतची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहेे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १६ मार्च रोजी दिवेकर हॉस्पिटलजवळ सुरज साळुंखे (रा. कोंडवे) हा रिक्षा वळवत असताना ती अचानक पलटी झाली. या अपघातात रिक्षामधील सुरज रमेश कंठ्ठी (वय १६) हा जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून, या प्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार बाबर करत आहेत.