अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 November 2024


सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी संध्याकाळी सात वाजता म्हसवे ते करंजे रस्त्यावर हसन राज मोहम्मद शेख रा. सैदापूर, सातारा यांच्या दुचाकीस क्र. एमएच 11 सीझेड 2672 धडक देऊन त्यांच्या दुचाकी वरील पाठीमागे बसलेल्या जियालाल दशरथ राम यांना जखमी केल्याप्रकरणी दुचाकी क्र. एमएच 11 बीयु 8549 वरील चालक अविनाश वसंत राठोड रा. म्हसवे, ता. सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या