महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापनाकडील नळजोडणी धारकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 16 September 2025


सातारा :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा होतो, अशा ग्राहकांना पाणी पुरवठा संबंधीत अद्ययावत माहिती व्हावी, पाणी देयके वेळेत पोहोच व्हावी, यासाठी आपण आपली माहिती प्राधिकरणाचे दप्तरी दर तीन वर्षांनी अद्ययावत (KYC Update) करणे आवश्यक आहे.  प्राधिकरणाचे नळ पाणी ग्राहक असलेल्यांनी कागदपत्रांची पूर्तता १५ दिवसांचे आत प्रत्यक्ष प्राधिकरण कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी. यासाठी  पाणी देयकाची सत्यप्रत, आधारकार्ड,  मिळकत उतारा ७/१२/ ८अ/८ड/प्रॉपर्टीकार्ड/ सिटीसर्व्हे / मतदान / रेशनकार्ड, आधारकार्ड, पाणी देयकावर कायमस्वरूपी नोंद करणेसाठी मोबाईल क्रमांक, कार्यालयात प्रत्यक्ष स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, आपला सविस्तर पत्ता व जवळील खुण इत्यादी कागदपत्रे सादर करावीत. 

वापर करीत असलेली नळजोडणी अन्य कोणाचे नावे असेल,  मूळ नळजोडणीधारक मयत असेल, मूळ नळ जोडणीधारकांचे आपण कायदेशीर वारसदार असाल अथवा आपण मिळकत खरेदी केली असेल तर अशी नळजोडणीधारकांनी  त्वरीत या कार्यालयाशी संपर्क साधून आपले नावे १ महिन्याच्या आत करून घ्यावी. १ महिन्याच्या कालावधीत सदर नळजोडणी आपले नावे न करून घेतल्यास विना सूचना नळजोडणी बंद करणेत येईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कळविले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा भव्य मोर्चा
पुढील बातमी
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर

संबंधित बातम्या