सातारा : शनिवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील शनिवार पेठेतील रामाच्या मंदिरासमोर उभे केलेली दुचाकी (एमएच 11 सीएफ 4675) दि. 28 रोजी अज्ञाताने चोरुन नेली. याबाबत विशाल बाळकृष्ण चव्हाण (वय 50, रा. शनिवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार बोडरे तपास करत आहेत.