सातारा : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य चळवळीत असंख्य भारतीयांचा युद्धघोष बनले. हे गीत स्वातंत्र्य सैनिकांचे गीत बनले. 24 जानेवारी 1950 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्य लढ्यातील वंदे मातरमची महत्त्वाची भूमिका पाहता राष्ट्रगीत जन गण मन प्रमाणेच त्याला दर्जा असेल आणि त्याचा तितकाच सन्मान केला जाईल, असे सांगितले. संविधान सभेतील त्यांच्या भाषणाने वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच दर्जा आहे हे प्रस्थापित केले. या गीताला 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी या गीताचे अत्यंत उत्साहात आणि जोषात सामुहिक गायन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत 'वंदे मातरम’ गीताचे करण्यात आले. जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, तहसील कार्यालयांबरोबर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था महाविद्यालये, शाळा या ठिकाणी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यामध्ये हजारोच्या संख्येनी विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले. वंदे मातरम या गतीच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त वर्षभर चार टप्प्यामध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत