सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातुन मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साहिल शेख, युवराज चव्हाण, पियुष पवार, अथर्व मोरे, प्रणव भोसले यांच्या विरुध्द मनोज बाळकृष्ण बडदे (वय २५, रा. कोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १ ऑक्टोबर रोजी देगाव फाटा येथे घडली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.