सातारा : गोडोली येथे भरधाव बुलेट चालकाने रस्ता क्रॉस करणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाला धडक देऊन जखमी केल्याची घटना दि.१८ रोजी घडली आहे. शंकर निवृत्ती पवार असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याप्रकरणी संजयकुमार शंकरराव पवार (वय ५५, रा. विलासपूर,गोडोली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून बुलेटचालक मंदार महेंद्र जाधव (रा.रविवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या धडकेत पवार यांच्या उजव्या पायास गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्यास मार लागला आहे. अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहे.