सध्या रि-रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. नव्या चित्रपटांनाही या जुन्या चित्रपटांना मागे टाकले आहे. त्यापैकीच एक तुंबाड चित्रपट. रि-रिलीज झाल्यानंतरही तुंबाडला चांगला प्रतिसाद मिळाला. तर पहिल्या आठवड्यामध्ये करीना कपूरच्या बकिंगहॅम मर्डर्सपेक्षा तुंबाडने जास्त कमाई केली आहे.
तुंबाड हा हॉरर चित्रपट आहे. पुन्हा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कमाई करत आहे. सोबतच करीना कपूरचा द बकिंगहॅम मर्डर्स हा चित्रपटही सिनेमागृहामध्ये आहे. तो खूप कमी स्क्रीनवर प्रदर्शित झाला. तुंबाडने पहिल्या आठवड्यामध्ये ७.५० कोटींची कमाई केली. तर बकिंगहॅम मर्डर्सने ७ कोटींचा आकडा पार केले आहे.
या चित्रपटाची खास बाब म्हणजे तुंबाडच्या बॉक्स ऑफिसवर करीना कपूर खानचा चित्रपट ‘द बर्किंगहम मर्डर्स’शी टक्कर होत आहे. पण ‘तुम्बाड’ने ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ला मागे टाकले आहे. प्रत्येक दिवशी बॉक्स ऑफिसवर हंसल मेहताद्वारा दिग्दर्शित चित्रपटाला मागे टाकले आहे.
रिपोर्टनुसार, ‘तुंबाड’ने पहिल्या आठवड्यामध्ये ७.५० कोटी रुपयांची कमाई केली. ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ने आठवड्यात ५.२५ कोटी रुपये कमाई केली आहे. १२ ऑक्टोबर, २०१८ ला तुंबाड रिलीज झाला होता. हिंदी, तेलुगू, तमिळ, आणि मराठी भाषांमध्ये रिलीज झाला होता. त्याचे दिग्दर्शन, लेखन राही अनिल बर्वेने केला होता. तर सोहम शाह फिल्म्स बॅनर अंतर्गत हा चित्रपट बनवला होता. सोहम शाह या चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य भूमिकेत देखील होते.