वडूज : लग्नाचे आमिष दाखवून जागरणातील महिला कलाकारावर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी किरण शिवाजी गुळीक (रा. शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) या युवकाविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीतील अधिक माहिती अशी, शुक्रवार दि. 21 जून 2025 ते दि.1 जुलै 2025 दरम्यान (तांदुळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) येथे किरण गुळीक याने जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, असे खोटे सांगुन तक्रारदार महिलेला दुचाकी (क्र.एम.एच- 42- बी.एल -6942) वरुन तांदुळवाडी येथील एका रुमवर नेले. तेथे गेल्यावर ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करणार आहे’, असे सांगून पीडितेवर अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगीतल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अमित शिंदे करत आहेत.