रिमांड होम येथून १७ वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तीने पळवले; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 19 February 2026


सातारा : सदर बझार येथील बाल निरीक्षण गृह (रिमांड होम) येथून १७ वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तीने कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद कर्मचारी विजय पांडुरंग कांबळे (वय ३२, रा.शिवथर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, दि. १७ रोजी रात्री पावणेदहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सर्वोदय कॉलनी शाहूपुरी येथे राहणारा सतरा वर्षीय युवक हा व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी निरीक्षण गृहात दाखल करण्यात आला होता. हॉलमधून बाथरूमला बाहेर गेला असता त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. 

तो पुन्हा माघारी न आल्याने कर्मचाऱ्यांची धावा धाव उडाली. त्याचा शोध घेतला असता तो कोठेही मिळून आला नाही, त्यामुळे याची फिर्याद विजय कांबळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बिले करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तडीपारीच्या उल्लंघन केल्याप्रकरणी प्रतापसिंह नगर येथील एकावर गुन्हा
पुढील बातमी
बेबलेवाडी प्राथमिक शाळेसमोर असलेल्या डीपी मधून ८० किलो तांब्याच्या तारेची चोरी

संबंधित बातम्या