09:04pm | Dec 03, 2024 |
सातारा : कराड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीत रस्त्याच्या कामासाठी झाडे तोडण्याची लिलाव प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने राबविली. मात्र, ही प्रक्रिया करताना नियमांना 'फाटा' दिला असून, शासनाचा महसूल बुडविला आहे. वन विभागाची परवानगी न घेता झाडांची विल्हेवाट लावली आहे. त्याबाबत चौकशी करण्याची मागणी पेरले येथील अमोल वीर यांनी जिल्हाधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कराड उत्तर कार्यालयाकडून पेरले ते हेळगाव दरम्यान रस्ता रुंदीकरण, डांबीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी पेरले ग्रामपंचायतीच्या हद्दीतील झाडे तोडण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र, त्यामध्ये अनियमितता असून, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली केली आहे.
या रस्त्यावरील सिल्व्हर ओकच्या झाडांची तोंडणी करण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया राबविली. मात्र, त्याची कोणत्याही दैनिकांत प्रसिध्दी दिली नाही. पेरले ग्रामपंचायतीच्या हद्दीत ही झाडे असतानाही पेरले ग्रामपंचायतीला नोटीस दिली नाही. तसेच हणबरवाडी ग्रामपंचायतीमध्ये नोटीस न जाहीर करता केवळ सही व शिक्के घेतले आहेत. यादववाडी येथे प्रशासक असतानाही सरपंचाचे सही, शिक्के घेतले आहेत. नियमांचे उल्लंघन करुन ही प्रक्रिया राबविली आहे.
वन विभागाकडून ११९ झाडांचे मूल्यांकन केले होते. काही झाडे तोडण्यास परवानगी दिली नव्हती. तरीही संबंधित ठेकेदारांनी सर्वच झाडे तोडली आहेत. तसेच वन विभागाने वाहतूक परवाना दिला नसतानाही तोडलेल्या झाडांची विल्हेवाट लावली आहे. पीडब्ल्यूडीचे अधिकारी, ठेकेदारांनी संगनमत करुन चुकीच्या प्रकारे ही प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. परवानगी नसतानाही वाहतूक केली आहे. मूल्यांकन नसलेली झाडे तोडली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही अमोल वीर यांनी केली आहे.प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |