सातारा : लडाखमधील पर्यावरण चळवळीचे नेते सोनम वांगचुक तसेच लेलदाक येथे अपेक्स चळवळीच्या कार्यकर्त्यांना झालेली अटक या सर्वांची केंद्र शासनाने तातडीने सुटका करावी या मागणीसाठी साताऱ्यात प्राकृतिक साहित्य पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले .वांगचुक यांना राष्ट्र का कायद्याखाली अटक करण्यात आली या प्रकाराचा त्यांच्या वतीने निषेध करण्यात आला
या आंदोलनाला पार्थ पोळके शिवाजी राऊत, चंद्रकांत खंडाईत, विजय निकम, गणेश कारंडे, असलम तडसरकर, प्राध्यापक दत्ताजीराव जाधव इत्यादी उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना पार्थ पोळके म्हणाले, लडाख येथे झालेला हिंसाचार आणि त्या संदर्भात कार्यकर्त्यांना झालेली अटक ही बाब निंदनीय आहे. केंद्र सरकारने येथील कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करावातसेच इस्त्राईल देशाच्या लगतच्या गाजापट्टीतील झालेल्या हिंसाचाराचा सुद्धा यावेळी निषेध करण्यात आला. शुक्रवारी पंचायतीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन सादर करणार असल्याचे चंद्रकांत खंडाईत यांनी सांगितले.