भिलार : स्ट्रॉबेरी रोपांच्या वितरणात अग्रेसर असलेल्या कृषिमित्र ॲग्रो इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे 2026 च्या हंगामासाठी स्ट्रॉबेरी फ्रिगो आणि मदर प्लांट्सचे आगाऊ बुकिंग अधिकृतपणे सुरू करण्यात आले असल्याची माहिती कंपनीचे संचालक महेश रसाळ यांनी दिली.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, महाबळेश्वर तालुक्यामध्ये दरवर्षी स्ट्रॉबेरीची रोपे हे परदेशातून आयात करावी लागतात. ही रोपे आयात करण्यासाठी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये बुकिंग केली जाते. महाबळेश्वर तालुक्याचे वातावरण थंडगार व पावसाचे असल्यामुळे या वातावरणात चांगले पीक येणाऱ्या रोपांची मागणी जास्त प्रमाणात आहे.
यावर्षी शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची आणि अधिक उत्पादन देणारी विविध वाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने नबिला, फ्लेमिनिया, मुरानो, विवारा, आर्डिया, पार्थेनोप वाणाची रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या रोपांचा विक्री कालावधी मे ते ऑगस्ट 2026 पर्यंत असून सर्व रोपांसाठी अंतिम मुदत 31 मार्च 2026 पूर्वी ॲडव्हान्स पेमेंटसह बुकिंग करणे आवश्यक आहे. या दोन लोकप्रिय वाणांसाठी पुढील 30 दिवसांच्या आत बुकिंग आणि पेमेंट करणे अनिवार्य आहे, अन्यथा या जातींची रोपे उपलब्ध होणार नाहीत.
फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ऑर्डर केवळ कृषिमित्र ॲग्रो इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेडफच्या अधिकृत सोसायटीकडे किंवा अधिकृत व्यक्तींकडेच नोंदवावी. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी व्यवहार करू नये, असे आवाहन महेश रसाळ यांनी केले आहे.