सातारा : पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी जीवन श्रीरंग सावंत (रा. क्षेत्र माहुली, सातारा) यांचा कृष्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.