सातारा : अपघात करुन एकास जखमी केल्याप्रकरणी एका दुचाकीचालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट येथे वाढे फाटा येथे दोन दुचाकींचा अपघात झाला. याप्रकरणी फिरोज दादाभाई सातारावाला (वय 75, रा. सदरबझार, सातारा) यांनी प्रशांत अंकुश कणसे (वय 40, रा. अंगापूर वंदन ता.सातारा) याच्या विरुध्द तक्रार दिली आहे. अपघातात तक्रारदार हे जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा