साताऱ्यात बसाप्पापेठ परिसरात दारू पिण्यासाठी कन्ट्रक्शन व्यवसायिकाला मारहाण करत जबरी चोरी

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा :  शहरातील बसाप्पापेठ परिसरात एका कन्ट्रक्शन व्यवसायिकाला दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी करून मारहाण करत जबरीने पैसे हिसकावून घेतल्याची घटना दि.७ रोजी घडली आहे. याप्रकरणी सोमनाथ शरद चोरगे (वय ४२, रा. रविवार पेठ सातारा) यांनी विक्रम उमेश कांबळे (वय २४, रा. रविवार पेठ भाजी मंडई) आणि अनोळखी तीन व्यक्तींविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा एसटी स्टँड समोर असलेल्या शेतकरी भाजी मंडई येथील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान विक्रम कांबळे याने फिर्यादी चोरगे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने कांबळे याने चिडून फिर्यादीला दोन कानाखाली मारून त्याच्या शर्टच्या वरच्या खिशातील ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर दुपारी सुमारे १२.३० ते १२.४५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी बसाप्पापेठ, सातारा येथे आला असता,संशयित आरोपीने त्याच्या सोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांसह फिर्यादीला पुन्हा हाताने मारहाण केली. यावेळी आरोपीकडे सुरीसारखे शस्त्र असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बागवान करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात दुचाकीस्वारांकडून चेन स्नॅचिंग; महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण
पुढील बातमी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ; सप्ताहानिमित्त पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन

संबंधित बातम्या